Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 15,252 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे.  कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 15 हजार 252 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झालेली नाही.

 

राज्यात आज 30 हजार 235 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 74 लाख 63 हजार 868 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.07 टक्के झाले आहे. राज्यात आज 75 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 859 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 50 लाख 99 हजार 654 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 77 लाख 68 हजार 880 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 58 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 09 लाख 05 हजार 696 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2610 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 15,252 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी ! बोलेरो आणि पिकअप गाडीचा वापर करुन ATM मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

 

Banking Rules Change | SBI, ICICI, PNB आणि Bank of Baroda यांनी नियमात केले मोठे बदल

 

Blood Sugar | मधुमेहात सर्वात जास्त प्रभावित होतात ‘हे’ अवयव, वेळेवर नाही केले नियंत्रण तर होऊ शकतात डॅमेज; जाणून घ्या सविस्तर