Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 1635 नवे रुग्ण, राज्याचा रिकव्हरी रेट 97.89 %, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून दररोज घट होताना पाहायला मिळत आहे. तसेच मृत्यूसंख्याही कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 1 हजार 635 नव्या रुग्णांचे (Coronavirus in Maharashtra) निदान झाले आहे. तर राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी होत आहे.

 

राज्यात आज 4 हजार 394 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 91 हजार 064 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.89 टक्के झाले आहे. राज्यात आज 29 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 43 हजार 576 इतकी आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 71 लाख 29 हजार 145 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 56 हजार 994 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 18 हजार 368 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 22 हजार 920 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1081 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 1635 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Crime | क्रिप्टो करेंसीच्या नावाखाली अनेकांची कोट्यावधीची फसवणूक, साथिदाराचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला पुण्यातून अटक; 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

 

Ahmednagar Crime | Army मध्ये नोकरीच्या आमिषाने युवकांना लाखोंचा गंडा, तोतया सैन्य अधिकारी गजाआड

 

Eknath Khadse | ‘मी टरबुज्या म्हणणार नाही पण…’; नाथाभाऊ देवेंद्र फडणवीसांवर बरसले !