Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1648 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या वर गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 1648 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 31 ओमिक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

 

मागील तीन ते चार दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या पुढेच येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 918 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 65 लाख 02 हजार 957 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.67 टक्के झाले आहे. राज्यात आज 17 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 84 लाख 55 हजार 315 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 57 हजार 888 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.73 टक्के आहे. सध्या 9 हजार 813 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 89 हजार 251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 891 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 1648 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

RIL Jio Happy New Year Offer | Jio नं नववर्षानिमित्त आणली भन्नाट ऑफर, जाणून घ्या काय मिळणार ‘या’ पॅकमध्ये?

Corporator Jyoti Ganesh Kalmakar | विविध अंगांने शहराचा विकास व्हावा – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

 

PM Kisan Yojana | 5 दिवसानंतर PM मोदी कोट्यवधी शेतकर्‍यांना देणार खुशखबर ! खात्यात येतील 4000 रुपये, लवकर करा ‘हे’ काम अन्यथा रखडू शकतो हप्ता