Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 18,067 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 18 हजार 067 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 113 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत.

 

राज्यात आज 36 हजार 281 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 74 लाख 33 हजार 633 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.87 टक्के झाले आहे. राज्यात आज 79 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.84 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 49 लाख 51 हजार 750 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 77 लाख 53 हजार 548 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 73 हजार 221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 9 लाख 73 हजार 417 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2617 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 18,067 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Traffic Police | माघी गणेशोत्सव निमित्त शिवाजी रोडवरील वाहतूकीत बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

 

Mumbai Crime | संतापजनक! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे, गुप्तांगही दाखवलं; प्रचंड खळबळ

 

Ramesh Deo Passes Away | ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे 93 व्या वर्षी निधन