Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 207 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 207 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 290 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 21 हजार 510 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09 टक्के झाले आहे. राज्यात आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 87 लाख 37 हजार 605 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 71 हजार 566 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 हजार 295 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण मुंबईत आहेत. सध्या मुंबईत 334 तर त्या खालोखाल अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात 217 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 207 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Medical College Pune | …म्हणून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय PPP तत्वावर चालविण्याचा प्रस्ताव

 

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीला 4 महिन्यांनी गुन्हे शाखेकडून अटक

 

Supriya Sule | 2022-23 च्या अर्थसंकल्पात काश्मिरी पंडितांसाठी काय तरतूद केली? सुप्रिया सुळेंचा केंद्रावर निशाणा