Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 229 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील नवीन रुग्णसंख्या अडीचशेच्या आत येत असून मृत्यूचे प्रमाण ही कमी झाले आहे. त्यातच कोरोना बाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 229 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 395 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 22 हजार 360 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आज 3 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 88 लाख 40 हजार 204 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 72 हजार 032 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 हजार 906 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
यामध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) मुंबईमध्ये (Mumbai) आहेत. मुंबईत 323 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
त्या खालोखाल अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात 189 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 229 new patients in state in last 24 hours find out other statistics
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | 12 रुपयांनी वाढून 2000 रूपये झाला ‘हा’ स्टॉक, 13 वर्षात 1 लाख झाले 1.64 कोटी

 

Deepika Padukone Bikini Bold Photos | दीपिका पादुकोनचे हॉट फोटो झाले लीक, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 

Sharad Pawar | नवाब मलिकांबाबत शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय?, बैठकीत एकमत झाले?