Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 237 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 237 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 455 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 21 हजार 965 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आज 2 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 759 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 87 लाख 94 हजार 179 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 71 हजार 803 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 हजार 075 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) मुंबईमध्ये (Mumbai) आहेत. मुंबईत 334 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्या खालोखाल अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहेत. ठाण्यात 192 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 237 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Varsha Gaikwad On SSC Exam | ‘पेपरफुटीचं प्रकरण आढळल्यास थेट…’; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय !

 

Hardik Pandya Yo-Yo Test | हार्दिक पांड्या IPL 2022 मध्ये खेळणार की नाही?; रिपोर्ट आला समोर

 

Pune River Development Project | मुळा- मुठा नदीकाठ सुधार योजना ! पर्यावरण प्रेमींनी घेतलेल्या आक्षेपांचे निरसन शास्त्रोक्त सादरीकरणाद्वारे – पुणे मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे