Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांखाली, गेल्या 24 तासात 25,175 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) मोठी घट पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 9 हजार 666 नव्या रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 25 हजार 175 जणांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 25 हजार 175 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 75 लाख 38 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 96.60 टक्के झाले आहे. राज्यात आज 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 074 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 55 लाख 54 हजार 798 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 03 हजार 700 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 1 लाख 18 हजार 076 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 7 लाख 24 हजार 722 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2394 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 25,175 patients discharge in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

व्यवसाय सुरू करण्यासाठी PMEGP योजनेंतर्गत मोदी सरकार देतंय सबसिडीसह 25 लाखापर्यंतचे कर्ज, असा करा अर्ज

 

Home Remedies For Periodontal Disease | हिरड्यांच्या समस्यांनी त्रस्त आहात का? मग ‘या’ 5 घरगुती उपायांनी मिळेल आराम; जाणून घ्या

 

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचं ट्वीट; म्हणाले – ‘मला मारहाण केल्याप्रकरणी शहराध्यक्षासह ‘या’ 8 शिवसेना नेत्यांना अटक होणार’