Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25,425 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 35 हजार 756 होती. तर आज रुग्ण संख्या 10 हजारांनी कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 25 हजार 425 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.

 

राज्यात आज 36 हजार 708 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.32 टक्के झाले आहे. राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.86 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 108 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 76 लाख 30 हजार 606 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.31 टक्के आहे. सध्या 2 लाख 87 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 25,425 new patients in state in last 24 hours find out other statistics
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

Pune Crime | अजित पवारांच्या नावाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन

 

Pune Corporation | रस्त्याच्या डांबरीकरणासाठीच्या वर्गीकरणावरून भाजपच्या दोन पदाधिकार्‍यांमध्ये ‘ठिणगी’