Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णसंख्या उतरणीला, गेल्या 24 तासात  ‘कोरोना’चे 28,286 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वाढताना दिसत होता. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही निर्बंध कडक केले होते. शाळा-कॉलेजेस देखील बंद केले होते. मात्र आता कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा वाढता आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात आज कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) 28,286 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 21 हजार 941 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 70 लाख 35 हजार 511 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.09 टक्के झाले आहे. राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 151 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.88 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 75 लाख 35 हजार 511 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 2 लाख 99 हजार 604 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 28,286 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya | किरीट सोमय्या थेट मंत्रालयात ! कर्मचाऱ्याच्या खुर्चीवर बसून केल्या फाईल्स चेक, चर्चेला उधाण

 

LIC Saral Pension Plan | एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदा प्रीमियम देऊन दरमहिना मिळवू शकता 12,000 रुपयांची पेन्शन, जाणून घ्या सविस्तर माहिती

 

Parbhani Crime | दुर्देवी ! शाळेत जाताना काळाने केला मोठा घात; ट्रकच्या धडकेत 3 भावडांचा मृत्यु