Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2831 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे.  कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 831 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

राज्यात आज 8 हजार 695 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 69 हजार 772 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.73 टक्के झाले आहे. राज्यात आज 35 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 66 लाख 39 हजार 114 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 47 हजार 746 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 30 हजार 547 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 3 लाख 14 हजार 351 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1544 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 2831 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nandurbar Police | मौजमजेसाठी विद्यार्थ्यांनी चोरले आश्रमशाळेतील लॅपटॉप; नंदुरबार पोलिसांकडून 48 तासात गुन्हा उघडकीस, 22 लॅपटॉप जप्त

 

Solapur Crime | मंगळवेढा येथील बहुचर्चीत दोन दरोड्याचा उलघडा, दरोडेखोरांची टोळी गजाआड; पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथून अटक

 

Pune Crime | प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांकडून अटक, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त