Coronavirus in Maharashtra | रुग्णसंख्येत मोठी घट! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 31,111 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. काल (रविवार) राज्यातील रुग्ण (Coronavirus in Maharashtra) संख्या 41 हजाराच्या वर गेली होती. आज यामध्ये 10 हजाराने घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 31 हजार 111 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 122 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली आहे.

 

राज्यात आज 29 हजार 092 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.3 टक्के झाले आहे. राज्यात आज 24 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.95 टक्के झाला आहे.

 

आजपर्यंत 7 कोटी 21 लाख 24 हजार 824 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 72 लाख 42 हजार 921 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.04 टक्के आहे. सध्या 2 लाख 67 हजार 334 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 22 लाख 64 हजार 217 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2994 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

राज्यात आज 122 ओमायक्रोनचे नवीन रुग्ण
आज 122 ओमायक्रोनचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 1860 रुग्ण आढळून आले आहेत.
तर 959 रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पुणे (PMC) – 40, मीरा भाईंदर (Mira Bhayander) -29,
नागपूर (Nagpur) -26, औरंगाबाद (Aurangabad) – 14, अमरावती (Amravati) – 7, मुंबई (Mumbai) – 4,
भंडारा (Bhandara), ठाणे (Thane) आणि पिंपरी-चिंचवड (PCMC) मध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

 

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 31,111 new patients in state in last 24 hours find out other statistics
 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jumbo Oxygen Plant in Mumbai | मुंबईत जम्बो ऑक्सिजन प्लांटची उभारणी ! दिवसाला 1500 ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होणार

 

Nawab Malik | ‘शरद पवार आता फडणवीसांना ‘काशीचा घाट’ दाखवतील’ – नवाब मलिक

 

LIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून घ्या सविस्तर