Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 33,914 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढला असला तरी आता नवीन रुग्णांच्या संख्येत थोडी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33 हजार 914 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 86 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 13 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णांची नोंद झाली असून ते पुणे जिल्ह्यातील आहेत.

 

 

राज्यात आज 30 हजार 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 71 लाख 20 हजार 436 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.7 टक्के झाले आहे. राज्यात आज 86 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.87 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 75 लाख 69 हजार 425 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.27 टक्के आहे. सध्या 3 लाख 02 हजार 923 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 16 लाख 20 हजार 371 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 33,914 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | खोटा दस्त अस्तित्वात आणुन मोठी आर्थिक फसवणूक ! हनिफ सोमजी, सोहेल सोमजी, अलनेश सोमजी आणि जेनिस सोमजीवर गुन्हा दाखल

 

Pune Crime | पुण्यातील झील एज्युकेशन सोसायटीमध्ये कोट्यावधीचा गैरव्यवहार ! संचालक संभाजी काटकर, चंद्रकांत कुलकर्णी आणि युवराज भंडारीला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक

 

Special Tips For Good Sleep | रात्री शांत झोप लागत नसेल तर उपयोगी पडतील एक्सपर्टच्या ‘या’ 9 टिप्स; जाणून घ्या