Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 3900 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच दररोज कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 3900 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1306 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

 

मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजारांच्या पुढेच येत आहे. तसेच ओमिक्रॉन व्हेरियंटने देखील चिंता वाढवली आहे. राज्यात आज 85 नवीन रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. मुंबईत आज अडीच हजार कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आल्याने मुंबईची चिंता वाढली आहे.

 

राज्यात आजपर्यंत 65 लाख 06 हजार 137 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.61 टक्के झाले आहे. राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 87 लाख 68 हजार 760 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 66 लाख 65 हजार 386 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.69 टक्के आहे. सध्या 14 हजार 065 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 22 हजार 906 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 905 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 3900 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Pune | 85 हजार रुपयांची लाच घेताना एकजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; चाकण पोलीस ठाण्यातील अधिकारी ‘ACB’च्या रडारवर, पुणे-पिंपरी पोलिस दलात प्रचंड खळबळ

New Year 2022 | नवीन वर्षात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्यांनी आपले आर्थिक नियोजन कसे करावे, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Mukesh Ambani Reliance | मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे उद्योग जगताचे लक्ष

Pune Corona | चिंताजनक ! पुण्यातील कोरोना रूग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 225 पेक्षा अधिक नवे रूग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक