Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 39,207 नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. काल राज्यातील रुग्ण (Coronavirus in Maharashtra) संख्येत 10 हजारांनी घट झाली होती. परंतु आज यामध्ये वाढ झाली आहे. राज्यात रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 207 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनबाधित (Omaicron) एकाही रुग्णांची नोंद झालेली नाही.
राज्यात आज 38 हजार 824 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 68 लाख 68 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.32 टक्के झाले आहे. राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 885 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.94 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 23 लाख 20 हजार 366 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 72 लाख 82 हजार 128 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.07 टक्के आहे. सध्या 2 लाख 67 हजार 659 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Maharashtra reports 39,207 new COVID cases, 38,824 recoveries, and 53 deaths today. Active cases: 2,67,659
Today, no new case of Omicron variant is reported in the state. pic.twitter.com/TeTabJ9GUg
— ANI (@ANI) January 18, 2022
Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 39,207 new patients in state in last 24 hours find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update