Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला ! गेल्या 24 तासात 43, 211 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. काल (गुरुवार) राज्यातील रुग्ण (Coronavirus in Maharashtra) संख्या 46,406 होती. आज यामध्ये मोठी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 43 हजार 211 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ओमायक्रॉनबाधित (Omaicron) 238 रुग्णाची नोंद झाली नाही. सर्वाधिक रुग्ण पुणे (PMC) 197 आहेत.

 

राज्यात आज 33 हजार 356 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.28 टक्के झाले आहे. राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.98 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 15 लाख 64 हजार 070 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 71 लाख 24 हजार 278 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.96 टक्के आहे.
सध्या 2 लाख 61 हजार 658 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 43, 211 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CDS Bipin Rawat | बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कशामुळे झाला? एअरफोर्सच्या चौकशी समितीने दिली माहिती

 

7th Pay Commission | मोदी सरकार किमान मूळ पगार 18,000 वरून वाढवून करणार 26,000 रुपये, लवकरच होऊ शकते घोषणा

 

Corona in Mumbai | मुंबईकरांना मोठा दिलासा ! नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट