Coronavirus in Maharashtra | राज्यात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक, गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43,697 नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 39 हजार 207 होती.  तर आज हीच आकडेवारी 43 हजारांच्या पार गेली आहे. राज्यात आज रुग्णसंख्या वाढली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 43 हजार 697 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 214 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झालेली आहे.

 

 

 

राज्यात आज 46 हजार 591 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 69 लाख 15 हजार 407 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.4 टक्के झाले आहे. राज्यात आज 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 934 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.93 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 25 लाख 31 हजार 817 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 73 लाख 25 हजार 825 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 10.10 टक्के आहे. सध्या 2 लाख 64 हजार 708 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 43,697 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

हे देखील वाचा

 

 

Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा; लवकरच डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

 

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ ! गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 3500 पेक्षा अधिक नवीन रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Dolly Khanna Portfolio | डॉली खन्ना यांचे ‘हे’ स्टॉक ठरले कुबेराचं धन; 6 महिन्यामध्ये अडीच पट रिफंड

 

Pune Crime | सुरक्षा रक्षक बनले ‘देवदूत’, डॉ. सतीश चव्हाण यांच्या अपहरण झालेल्या ‘स्वर्णव’ला सुखरुप पोहचवलं पालकांकडे