Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 5368 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत मागील तीन दिवसांपासून मोठी वाढ होत आहे. राज्यात आज तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 2-3 दिवसांपासून कोरोनाची संख्या ही दोन हजारांच्यावर येत आहे. आज रुग्णसंख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. त्यातच वर्षाअखेर, नवीन वर्ष (New Year) यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Variant) रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. देशातील सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

 

राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 2017 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.55 टक्के आहे.

 

सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत. आजपर्यंत राज्यात 6 कोटी 88 लाख 87 हजार 303 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 66 लाख 70 हजार 754 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.68 टक्के आहे.

मागील काही दिवसांतील रुग्ण वाढ

25 डिसेंबर -1485
26 डिसेंबर – 1648
27 डिसेंबर -1426
28 डिसेंबर – 2172
29 डिसेंबर – 3900
30 डिसेंबर – 5368

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 5368 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IPS Sachin Atulkar | आयपीएस सचिन अतुलकर फिटनेस मॉडल्सला सुद्धा देतात टक्कर, ‘या’ वर्कआऊट प्लानने बनवली मस्कुलर बॉडी

Government Scheme | ‘ही’ सरकारी योजना माजी सैनिकांच्या मुलींच्या लग्नासाठी देते 50,000 ची रक्कम; जाणून घ्या कसा मिळेल लाभ

Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेकमे आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?