Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6248 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे.  कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 6 हजार 248 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 121 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात आज 18 हजार 942 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.22 टक्के झाले आहे. राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.83 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 60 लाख 40 हजार 567 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 29 हजार 633 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 70 हजार 150 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 5 लाख 53 हजार 175 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 2386 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 6248 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Pune NCP | पुणे मनपा निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार? कार्यकारिणीच्या बैठकीत पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा, पण…

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 20 हजार रुपयाची लाच घेताना महावितरण कंपनीचा उप कार्यकारी अभियंता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Employee Pension Scheme | आता पगारदार वर्गाला मिळेल पहिल्यापेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते ‘ही’ मोठी घोषणा