Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 675 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या घटली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 675 नवे कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्ण आढळले आहेत. तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 104 ओमायक्रॉनबाधितांची (Omycron) नोंद झाली आहे. सध्या राज्यात 202 ओमायक्रॉनचे रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

 

राज्यात आज 01 हजार 225 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 12 हजार 568 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.04 टक्के झाले आहे. राज्यात आज 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 79 लाख 40 हजार 925 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 66 हजार 380 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 6 हजार 106 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 1 लाख 31 हजार 412 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 663 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | corona 675 new patients in state in last 24 hours find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | ‘युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये सुटकेबाबत विश्‍वास निर्माण करण्यात कुठेतरी कमी पडलो’, राष्ट्रवादीची केंद्र सरकारवर नाराजी

 

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 91 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Ramdas Athawale In Pune | महापालिका निवडणुकीत ‘रिपाइं’ला 25 जागा हव्यात; रामदास आठवले म्हणाले – ‘छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू राजे’