Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘गेल्या 24 तासात कोरोना’च्या 902 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. आज राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus in Maharashtra) हजाराच्या जवळपास आहे. तर रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण घटले आहे. राज्यात गेल्या 24 तासात 902 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 95 लाख 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.71 टक्के इतके आहे.

 

आज दिवसभरात 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 329 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. सध्या राज्यात 6 हजार 903 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 74 लाख 41 हजार 806 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 47 लाख 840 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 556 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 886 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

दरम्यान, राज्यात आज (शुक्रवार) ओमायक्रॉनच्या (Omicron Variant ) 8 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णापैकी सहा रुग्ण पुण्यातील आहेत. तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येकी एक-एक रुग्णाचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 109 वर पोहचली आहे.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 902 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau Pune | पिंपरी चिंचवड महापालिकेतील 2 कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; खळबळ प्रचंड

Pune Crime | एमपीएससी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, पुण्यात प्रचंड खळबळ

 

Thane-Diva corridor | 5 व्या आणि 6 व्या मार्गाच्या कामासाठी ठाणे- दिवा धिम्या कॉरिडॉरवर 18 तासांचा ‘मेगाब्लॉक’; जाणून घ्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेनची यादी