Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’च्या रुग्ण संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 929 जणांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात दैनंदिन रुग्णांची संख्या सहाशेच्या आसपास होती. मात्र आज राज्यातील कोरोनाची आकडेवारी (Coronavirus in Maharashtra) हजाराच्या जवळपास आहे. राज्यात बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या 6 हजारांवर आली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 925 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 929 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 94 लाख 617 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.72 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 298 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 6 हजार 467 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 71 लाख 82 हजार 510 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 46 लाख 061 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 75 हजार 868 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 864 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona 929 new patients in state in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Brahmastra Motion Poster | अखेर ‘ब्रम्हास्त्र’चं मोशन पोस्टर झालं प्रदर्शित, रणबीर दिसणार शिवाच्या भूमिकेत

Blood Sugar And High BP | ‘ब्लड शुगर’सोबतच हाय BP सुद्धा कंट्रोल करते काजू, जाणून घ्या इतर फायदे

31st Celebration Night Rules | 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून नवीन आदेश जारी; पार्ट्यांना रात्री 12 पर्यंतच परवानगी ?