ताज्या बातम्यामुंबई

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांचा आकडा वाढला, गेल्या 24 तासात 12,160 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या वाढत आहे. आज राज्यातील कोरोना बाधितांची संख्या बारा हजारांच्यावर गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच ओमिक्रॉनचे (Omycron Variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता अधिक वाढली आहे. आज दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या 50 हजाराच्या वर गेली आहे.

 

राज्यात गेल्या 24 तासात 1748 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 65 लाख 14 हजार 358 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.05 टक्के झाले आहे. राज्यात आज 11 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 553 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.1 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 6 कोटी 93 लाख 70 हजार 095 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 67 लाख 12 हजार 028 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.7 टक्के आहे. सध्या 50 हजार 422 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 1096 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Corona patient numbers rise in the state, 12,160 new patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar Crime | कोपरगाव शहर हादरलं ! भरदिवसा सोमवारच्या आठवडी बाजारात तरुणाचा खून

 

Joint CP Dr Ravindra Shisve | केंद्र शासनाकडून पुण्याचे ज्वाईंट सीपी डॉ. रवींद्र शिसवेंना IG Empanelment; सह आयुक्त म्हणाले – ‘बहुमान मिळाल्यानं आनंद’

 

Anil Parab | केंद्राने दिलेली मुदत संपल्याने मंत्री अनिल परब यांच्यावर कारवाईची शक्यता

Back to top button