Coronavirus in Maharashtra | ठाकरे सरकारचं टेन्शन वाढलं ! पुण्यासह राज्यातील ‘या’ 5 जिल्ह्यात बाधितांची संख्या अधिक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra | राज्यातील कोरोना (Coronavirus in Maharashtra) परिस्थितीवर भाष्य करताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. या स्थितीत कोरोनाचं विघ्न पडू नये यासाठी जनतेने खबरदारी घेणं आवश्यक आहे. राज्य सरकारने (State Government) लागू केलेल्या कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी करू नये. गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. अन्य राज्यांकडे बघून आपण उदाहरण घेतलं पाहिजं. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावं असं टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं आहे.

केरळमध्ये (Kerala) ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. सध्याच्या स्थितीत अन्य राज्यात संक्रमण कमी आहे. मात्र, केरळमध्ये भयंकर परिस्थिती आहे. तेथे यावेळी दर दिवसाला तीस हजाराच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. अपवादात्मक म्हणजे 6 सप्टेंबरला 19 हजार रुग्ण आढळले. तर, महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात (In 5 districts) कोरोना संक्रमण वाढत असल्याचं देखील राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं. दरम्यान, या पाचमध्ये मुंबई-पुण्याचा देखील समावेश असल्याचं ते म्हणाले.

महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात संक्रमण वाढलं…

राज्यातील पुणे (Pune), सातारा (Satara), अहमदनगर (Ahmednagar), मुंबई (Mumbai) आणि रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने सरकारची डोकेदुखी वाढलीय. या जिल्ह्यात कोरोना संक्रमिक संख्या जास्त आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित संख्येपैकी 70 % या 5 जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात राहणाऱ्या नागरीकांना सतर्क राहणं गरजेचे आहे. मुंबईच्या ज्या भागात सर्वात उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो त्या परिसरात संक्रमण अधिक होण्याची भीती आहे. लालबागच्या राजा गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप लांबून लोकं येतात.मात्र, मुंबईत लालबाग आणि परळ भागात कोरोना संक्रमण सध्या अधिक असल्याचं टोपे म्हणाले.

 

5 जिल्ह्यातील रुग्णांचीृ संख्या –

पुणे – 12 हजार 413

सातारा – 6 हजार 323

अहमदनगर – 4 हजार 975

मुंबई – 4 हजार 273

रत्नागिरी – 1081

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | coronavirus 5 districts maharashtra increase tension thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BPCL च्या घरगुती गॅस ग्राहकांना खासगीकरणानंतर सुद्धा मिळत राहील सबसिडी

Pune News | ‘डीएनडी’ असूनही अनावश्‍यक फोन ! जिओ आणि व्होडाफोन-आयडिया कंपन्यांविरोधात जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल

Multibagger Stock | 42 वरून 800 रूपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदार झाले मालामाल ! 1 लाखाचे झाले 19 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?