Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 661 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून घट होत असल्याचे पहायला मिळत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. आजही राज्यात 661 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 896 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 58 लाख 045 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.6 टक्के झाले आहे.
तसेच आज दिवसभरात 10 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 372 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 14 हजार 714 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 31 लाख 75 हजार 053 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 16 हजार 762 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 1 लाख 48 हजार 880 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 968 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Diagnosis of 661 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Rains | राज्यात आगामी 3 दिवसांमध्ये वीजेच्या कडकडाटांसह जोरदार पावसाचा अंदाज, IMD नं दिला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 23 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO कडून PF अकाऊंटमध्ये व्याज होऊ लागले जमा, ‘या’ पध्दतीनं जाणून घ्या किती झाली ‘कमाई’