मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत मागील काही दिवसांपासून चढ उतार पहायला मिळत आहे. राज्यात आज (बुधवार) 893 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 1040 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 64 लाख 89 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्के इतके झाले आहे. राज्यातील ओमायक्रॉन (Omycron) विषाणू आढळलेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
गेल्या 24 तासात राज्यात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) 2.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये 6 हजार 286 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 893
*⃣Recoveries – 1,040
*⃣Deaths – 10
*⃣Active Cases – 6,286
*⃣Total Cases till date – 66,40,888
*⃣Total Recoveries till date – 64,89,720
*⃣Total Deaths till date – 1,41,204
*⃣Tests till date – 6,63,88,902(1/4)🧵
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) December 8, 2021
राज्यात आजपर्यंत (Coronavirus in Maharashtra) तपासण्यात आलेल्या 6 कोटी 63 लाख 88 हजार 902 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 40 हजार 888 जणांना कोरोनाची बाधा (Coronavirus in Maharashtra) झाली आहे.
सध्या राज्यात 74 हजार 170 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत.
तर 891 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | Discharge of 1040 corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update