Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1087 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 699 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होत असताना मृत्यू होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारी (दि.6) राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला होता.आज यामध्ये थोडी वाढ झाली असून गेल्या 24 तासात राज्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 64 लाख 88 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.72 टक्के झाले आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) 2.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये 6 हजार 445 अॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Coronavirus in Maharashtra)

 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 62 लाख 55 हजार 554 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये 66 लाख 39 हजार 995
जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
सध्या राज्यात 77 हजार 642 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत.
तर 896 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Discharge of 1087 patients of ‘Corona’ in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणात लातूरच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, शिक्षकांसह 5 जणांना अटक; आतापर्यंत 11 जणांना अटक

Samantha Prabhu | घटस्फोटावर समंथाने सोडलं मौन, म्हणाली – ‘मी सगळ सहन केलं, पण गर्भपात, अफेअर…’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 49 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी