Coronavirus in Maharashtra | महाराष्ट्रात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 942 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 678 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 83 हजार 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.71 टक्के झाले आहे.

 

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असताना मृतांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या 24 तासात राज्यात 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 997 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूचे प्रमाण (Fatality Rate) 2.12 टक्के झाले आहे. सध्या राज्यामध्ये 7 हजार 555 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Coronavirus in Maharashtra)

 

 

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 55 लाख 11 हजार 394 प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये
66 लाख 35 हजार 658 जणांना कोरोनाची बाधा (Corona infection) झाली आहे.
सध्या राज्यात 84 हजार 421 लोक होम क्वारंटाईन ( home quarantine) आहेत.
तर 963 लोक संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये (institutional quarantine) उपचार घेत आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Discharge of 942 corona patients in Maharashtra in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा