Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Coronavirus in Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळून येत आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्याला चिंता लागली आहे. यातच आज (बुधवारी) (Coronavirus in Maharashtra) राज्यात 26 हजार 538 कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 8 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

 

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने विस्फोट केला असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन विषाणूने (Omicron) धास्ती वाढवली आहे. आज राज्यात ओमायक्राॅनचे 144 रूग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) देखील अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार आज नवे निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. (Coronavirus in Maharashtra)

राज्यासह मुंबईत (Mumbai) देखील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने मुंबईकरांची धास्ती देखील वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्याची चिंता वाढली असल्याने आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

गेल्या 24 तासात 5 हजार 331 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 87 हजार 505 रूग्ण सक्रिय आहेत. ओमिक्रॉनचा आकडा 797 वर पोहचला असून त्यापैकी 330 जण बरे झाले आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Extremely worrying! More than 26,500 new corona patients in the state in the last 24 hours, learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Universities-Colleges Maharashtra | राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; उदय सामंत यांची माहिती

 

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

 

Pune Crime | जागेत अतिक्रमण करून बेकायदा ऑफिस बांधले ! सुमेरू बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा

 

Loss Proof Stocks | 5 शेयर्सने 10 वर्षात कधीही होऊ दिला नाही गुंतवणुकदारांचा तोटा, तुमच्याकडे आहे का एखादा?

 

How To Earn-Save | कसे कमवायचे, कशी बचत करायची, कुठे किती खर्च करायचा, ‘या’ एक्सपर्टच्या टिप्स तुमच्या कामी येतील