सावधान ! मुंबईत ‘कोरोना’चे आणखी 4 रूग्ण, राज्यातील संख्या 38 वर

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्यात अजून ४ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही संख्या आता ३७ वर पोहोचली आहे. मुंबईमध्ये तीन आणि नवी मुंबईत एक असे चार रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. दरम्यान राज्यभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृह बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यात पुण्यात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत, तर पुण्यानंतर आता मुंबईमध्ये देखील ही संख्या वाढतच आहे. त्यामुळे मुंबईकरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यभरात जवळपास ३७ लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात पुणे सर्वात पुढे असून त्यापाठोपाठ मुंबई आहे. जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना लागण झाली आहे.

पुणे – १६,
मुंबई – ८,
नागपूर – 4,
यवतमाळ – 2,
नवी मुंबई – २,
ठाणे – 1,
अहमदनगर – 1,
कल्याण 1,
पनवेल – 1,
औरंगाबाद – 1

हा विषाणू कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने लवकर पसरतो. त्यामुळे प्रशासनाकडून या विषाणूच्या बचावासाठी खबरदारी घेतली जात आहे. विविध शाळा, महाविद्यालये, चित्रपट गृह ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आली असून गर्दीच्या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान या विषाणूपासून बचावासाठी प्रशासनाकडून विविध पावले उचलली जात आहे.