Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या हजाराच्या आत, मृत्यूच्या संख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्येत (Coronavirus in Maharashtra) मोठी घट पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. रुग्ण संख्या कमी झाल्याने राज्यातील सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत राज्यात 806 नव्या रुग्णांची (Coronavirus in Maharashtra) नोंद झाली आहे. तर 4 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 2 हजार 696 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आजपर्यंत 76 लाख 97 हजार 135 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.94 टक्के झाले आहे. राज्यात आज 4 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 43 हजार 586 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 72 लाख 89 हजार 104 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 59 हजार 237 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या 14 हजार 525 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 1 लाख 76 हजार 378 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 1036 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Great relief! Corona’s daily patient count in the state is less than a thousand, the number of deaths has dropped dramatically, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nanded Terrible Accident | दुर्देवी ! नांदेडमध्ये नववधूला घेऊन जाताना भीषण अपघात, नवरीसह 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

 

Mohit Kamboj | ‘संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून त्यांनी युतीत विष कालवलं’

 

Indrani Balan Foundation | पहिली ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा