Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा ! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 889 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज मोठी घट झाली असून रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घडली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास स्थिरावली होती. आज राज्यात 889 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 586 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 37 लाख 025 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.47 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 12 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 028 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 23 हजार 184 रुग्णांवर (Coronavirus in Maharashtra) उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 19 लाख 78 हजार 155 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 03 हजार 850 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 83 हजार 092 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 957 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Great relief! Diagnosis of 889 patients of ‘Corona’ in the last 24 hours in the state, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Winters Superfood | आला हिवाळ्याचा हंगाम ! आजारांपासून बचाव करायचा असेल तर खाण्यास सुरूवात करा ‘हे’ 10 सुपरफूड

Eknath Khadse | पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना मोठा दिलासा

Pune BJP | 100 कोटी डोस पूर्ण झाल्याने पुणे भाजपकडून लसीकरण केंद्रात केक कापून ‘सेलिब्रेशन’