Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 1,823 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यात अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 823 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 294 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 28 कोरोनाबाधित रुग्णांचा (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 542 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 01 हजार 287 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.32 टक्के एवढे झाले आहे.

 

 

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 77 हजार 872 इतकी आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 01 लाख 98 हजार 173 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 77 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 892 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 1 हजार 093 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 33 हजार 449 अॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 1,823 people in the state are corona free, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shashi Tharoor | ‘संसदेत महात्मा गांधींच्या बाजूला सावरकरांचा फोटो कशासाठी?’ शशी थरूर यांचा सवाल

Nitesh Rane | नितेश राणेंची शिवसेनेवर बोचरी टीका, म्हणाले- ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण…’

Pune Crime | पुणे ग्रामीण पोलिसांकडून लोणावळयातील हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दिल्लीच्या 2 मुली आढळल्या; प्रचंड खळबळ