Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 2,446 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (शनिवार) वाढ झाल्याचे दिसत आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज कमी झाली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे. आज राज्यात कोरोनाचे (Coronavirus in Maharashtra) 2,486 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,446 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 99 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 44 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 514 रुग्णांचा (Coronavirus in Maharashtra) मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यातील मृत्यूदर स्थिरावला आहे.

सध्या राज्यात 33 हजार 006 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 57 हजार 326 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 75 हजार 578 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 41 हजार 499 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 1,023 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 2,446 people in the state have been ‘corona free’, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर एकाच्या डोक्यात फरशी घालून खून

High Court | हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ‘दलित व्यक्तीने क्रॉस घातल्यास किंवा चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’

Mumbai Police Cyber Cell | मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’