Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,876 रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 2 हजार 763 रुग्ण बरे झाले आहेत. तर 2 हजार 876 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 90 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 362 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे.
राज्यात आजपर्यंत 63 लाख 91 हजार 662 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.32 टक्के एवढे झाले आहे. (Coronavirus in Maharashtra)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 96 लाख 19 हजार 637 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 67 हजार 791 नमुने पॉझिटिव्ह (positive patients) आले आहेत.
सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 760 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 1 हजार 416 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 33 हजार 181 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 2,876 patients of Corona have been registered in the state, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Municipal Election | पुण्यात असणार ‘एवढे’ नगरसेवक आणि प्रभाग, कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश

Pension News | 3 लाखपेक्षा जास्त पेन्शनरला सरकारकडून मोठी भेट, ‘या’ तारखेपासून वाढवली रक्कम

ST Driver Suicide | एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ