Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,240 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – राज्यात आज (गुरुवार) 03 हजार 595 नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 240 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनातून (Coronavirus in Maharashtra) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 63 लाख 20 हजार 310 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 97.06 टक्के झाला आहे. आज 45 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 322 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.12 टक्के आहे.

 

 

राज्यात सध्यात 49 हजार 342 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 65 लाख 29 हजार 882 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 65 लाख 11 हजार 525 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 02 लाख 89 हजार 425 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1 हजार 908 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 215 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 161 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 06 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02.
– 188 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 498882.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1908.
– एकूण मृत्यू – 8990.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 487984.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 9420.

 

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी

– दिवसभरात 183 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 120 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 272191.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1121.
– एकूण मृत्यू – 4416.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 272191.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5808.

 

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.68 %

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 11 लाख 28 हजार 462 रुग्णांपैकी 11 लाख 2 हजार 247 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण 7 हजार 504 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.68 टक्के आहे.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours, 3,240 people in the state are ‘corona free’, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update