Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,029 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत आज (मंगळवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. तर दैनंदिन मृत्यूची संख्या वाढली आहे. राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 2 हजार 844 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 3 हजार 029 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 लाख 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.26 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 60 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 38 हजार 962 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 36 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु  (Active patient) आहेत.
राज्यात (Coronavirus in Maharashtra) आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 84 लाख 29 हजार 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 44 लाख 606 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 54 हजार 985 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,514 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Title :- Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,029 patient ‘corona’ free, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tehsildar Appointment | पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या 20 तहसीलदारांच्या नियुक्त्या

Pune Corporation | ड्रेनेज सफाईसाठी 4 जेटींग मशीन 7 वर्षे भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने एक महिना पुढे ढकलला

MLA Suhas Kande | शिवसेना आमदार सुहास कांदे यांना छोटा राजन टोळीकडून धमकी