Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,292 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोना बाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (रविवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची संख्या तीन हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. आजही राज्यात 3 हजार 206 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 3 हजार 292 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 64 लाख 027 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.24 टक्के आहे.
तसेच आज (Coronavirus in Maharashtra) दिवसभरात 36 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 38 हजार 870 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 37 हजार 860 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 81 लाख 58 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 44 हजार 325 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 61 हजार 072 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,515 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Web Titel :- Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,292 patients ‘corona’ free, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त ! जाणून घ्या आता गुंतवणूक केली तर 2021 अखेरपर्यंत किती मिळू शकतो नफा

Rupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘मनसे’च्या रूपाली पाटील संतापल्या, म्हणाल्या – ‘सुधरा रे सुधरा, लायकी नाही तुमची लोकप्रतिनिधी व्हायची’ (व्हिडीओ)

Pune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन