Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,933 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Coronavirus in Maharashtra | राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (New Cases) आज (शुक्रवार) घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात आज 3,286 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3,933 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 57 हजार 012 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.23 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 51 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 776 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यात 38 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत.
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 78 लाख 19 हजार 395 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 37 हजार 843
नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 2 लाख 58 हजार 653 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,462 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | In the last 24 hours in the state 3,933 patients ‘corona’ free, learn other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Indian Army | काश्मीरमधून भारतीय लष्कर हटवले तर तिथे सुद्धा तालिबान येईल, ब्रिटिश खासदाराने जगाला दिला इशारा (व्हिडीओ)

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Varsha Gaikwad | शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू ! पालकांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी; सूचनांबाबत शिक्षणमंत्री म्हणाल्या…