Coronavirus in Maharashtra | राज्यात रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 997 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यातील कोरोना बाधित (Coronavirus in Maharashtra) रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. शुक्रवारी (दि.12) राज्यातील कोरोनाची आकडेवारी हजाराच्या आत आली असताना मृतांची (Death) संख्या मात्र वाढली आहे. तर बरे (Recover) होणाऱ्या रुग्णाचे प्रमाण आज नवीन रुग्णांच्या तुलनेत कमी आहे. राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) 997 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 945 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

राज्यात आतापर्यंत 64 लाख 65 हजार 893 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे.
त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.64 टक्के आहे.
तसेच आज दिवसभरात 41 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात 1 लाख 40 हजार 516 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.

 

सध्या राज्यात 12 हजार 290 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 37 लाख 47 हजार 431 प्रयोगशाळा
नमुन्यांपैकी 66 लाख 22 हजार 345 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात सध्या 1 लाख 07 हजार 033 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत
तर 1 हजार 028 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

 

Web Title : Coronavirus in Maharashtra | Increase in patient deaths in the state, 997 new cases of corona diagnosed in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Chandrakant Patil | ‘… तर कंगना बरोबर आहे’, कंगनाच्या वादग्रस्त विधानानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

Pune Crime | पुण्याच्या कब्रस्तानात प्रेमीयुगुलाचं सुरू होतं ‘गुलूगुलू’, पुढं झालं असं काही…

Nawab Malik | ‘भाजपच्या एका माजी मंत्र्यानं मंदिराची शेकडो एकर जमीन हडपलीय’; मलिकांचा आणखी एक बाॅम्ब