Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये मोठी वाढ, गेल्या 24 तासात 1410 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात आज कोरोनाबाधितांच्या (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पहायला मिळत आहे. राज्यात आज 1410 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868 रुग्ण कोरोनामुक्त (Coronavirus in Maharashtra) झाले आहेत. मागील दोन -तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. त्यातच ओमायक्रॉन (Omycron Variant) बाधित रुग्ण देखील आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने (State Government) राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध (New Restrictions) लागू केले आहेत.

 

राज्यात आजपर्यंत 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.69 टक्के झाले आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.12 टक्के झाला आहे.

 

आजपर्यंत 6 कोटी 82 लाख 35 हजार 476 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 66 लाख 54 हजार 755 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.75 टक्के आहे.
सध्या 8 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 86 हजार 815 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

राज्यात ओमायक्रॉनचे 20 रुग्ण
राज्यात आज 20 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 108 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे.
त्यापैकी 54 रुग्ण बरे झाले आहेत. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मुंबई -11, पुणे-6, सातारा- 2 आणि अहमदनगर -1 येथील रुग्ण आहेत
राज्यात सर्वाधिक मुंबईमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत 46 रुग्ण आढळले आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Large increase in corona patients in the state, 1410 new patients diagnosed in last 24 hours, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 65 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

7th Pay Commission | 12 लाख पेन्शनधारकांसाठी ‘इथं’ वाढला DR, परंतु यांना होणार नाही लागू

Crime News | मुलीला पळवून केलं ‘शुभमंगल’, तरूणीच्या नातेवाईकांनी तरूणाचा चक्क प्रायव्हेट पार्टचं कापून केलं ‘अमंगळ’