Coronavirus : राज्यात ‘कोरोना’च्या रूग्णसंख्येची ‘उच्चांकी’, आतपर्यंतची सर्वात मोठी वाढ

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर सुरुच असून दरदिवशी 13 ते 15 हजार रुग्णसंख्येत भर पडत आहे. काल आतापर्यंतचे सर्वात  जास्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या साडेसात लाखांच्या पुढे गेली आहे.

 

 

 

 

राज्यात मागील काही दिवसांपासून दररोज 14 ते 15 हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत आहे. रुग्णवाढीच्या या वेगामुळे एकूण संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे काहीशी चिंताजनक स्थिती असताना काल राज्यात तब्बल 16 हजार 867 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असून, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या साडेसात लाखांच्या पुढे गेली आहे. दिवसभरातील आकडेवारीची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. राज्यात काल  16 हजार 867 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली.  नवीन 11 हजार 541 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असल्याचे ट्वीट त्यांनी केले आहे.