Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढला!, गेल्या 24 तासात 46, 406 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वेगाने वाढत आहे. काल (बुधवार) राज्यातील रुग्ण (Coronavirus in Maharashtra) संख्या 46,723 होती. आज यामध्ये थोडी घट झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 406 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झाली नाही. मागील दोन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही कमी होताना दिसत आहे.

राज्यात आज 34 हजार 658 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 66 लाख 83 हजार 769 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.39 टक्के झाले आहे. राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 41 हजार 737 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 13 लाख 59 हजार 539 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 70 लाख 81 हजार 067 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.92 टक्के आहे. सध्या 2 लाख 51 हजार 828 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Outbreak of corona increased in the state !, 46,406 new patients in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Corona Treatment | कोविडवर उपचारासाठी ‘ही’ 3 औषधे घेण्याचा केंद्र सरकारने दिला सल्ला; जाणून घ्या मेडिसीनची नावे

 

Pune Water Supply | पुणे शहरात ‘या’ दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार

 

Pune Crime | कंटेनरमध्ये 22 लाखांचा गुटखा, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई