Coronavirus in Maharashtra | दिलासादायक! राज्यात ‘कोरोना’ची दैनंदिन रुग्णसंख्या पाचशेच्या आत, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाची (Coronavirus in Maharashtra) दैनंदिन रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यातच मृत्यूसंख्या कमी झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णांची (Active Patient) संख्या कमी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासात 467 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत. तर 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

राज्यात आज 1 हजार 144 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 14 हजार 719 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.06 टक्के झाले आहे.
राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 43 हजार 718 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 65 हजार 969 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 78 लाख 67 हजार 391 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 4 हजार 953 सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात 42 हजार 118 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत.
तर 602 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | The daily number of corona patients in the state is less than five hundred, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | ‘…तर नवाब मलिक यांना मंत्री राहण्याचा कोणताही अधिकार नाही’; नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य!

 

Tax Savings Schemes | पीपीएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी खात्यात 31 मार्चपर्यंत करावे लागेल हे काम, अन्यथा बंद होऊ शकते अकाऊंट

 

Pune Crime | काय सांगता ! होय, इंदापूर तालुक्यात अफुची शेती