Coronavirus in Maharashtra | राज्यात आज रुग्णांची संख्या कमी पण मृत्यूची संख्या वाढली, गेल्या 24 तासात 1043 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोना संसर्गाची (Coronavirus in Maharashtra) दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. मात्र राज्यात अजुनही दररोज हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित (Coronavirus in Maharashtra) आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्याच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 043 रुग्ण बरे झाले आहेत. तर 960 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

 

राज्यात गेल्या 24 तासात 41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 807 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्के एवढे झाले आहे.

 

सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
सध्या राज्यात 84 हजार 261 व्यक्ती गृह विलगिकरणात (home quarantine) आहेत.
तर, 1084 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात (institutional quarantine) आहेत.
राज्यात आज रोजी एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण (Active Cases) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | The number of patients in the state today is low but the number of deaths has increased, 1043 patients ‘corona free’ in last 24 hours, Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा