Coronavirus in Maharashtra | राज्याला मोठा दिलासा! आज राज्यात एकही मृत्यू नाही, ‘कोरोना’च्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील कोरोनाच्या (Coronavirus in Maharashtra) रुग्णसंख्येत चढ उतार होत असताना आज कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. विशेष म्हणजे राज्यात आज एकाही कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू न झाल्याने राज्याला दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 251 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत.

 

राज्यात आज 448 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 20 हजार 922 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09 टक्के झाले आहे. राज्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.आजपर्यत राज्यात 1 लाख 43 हजार 752 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 7 कोटी 86 लाख 45 हजार 510 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 71 हजार 202 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 2 हजार 524 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 18 हजार 633 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 566 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | There is no death in the state today

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar In Pune | पुण्याला राज्यातील सर्वोत्तम शहर बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार (व्हिडिओ)

 

Corporator Archana Tushar Patil | कै. श्रीमती पार्वतीबाई दत्तात्रय पाटील इंग्लिश मिडीयम स्कूलचे उद्घाटन; नगरसेविका अर्चना पाटील यांच्या प्रयत्नांना यश

 

Pune Crime | दुकानातून भाड्याने कॅमेरे घेऊन त्याची विक्री करणारा भारती विद्यापीठ पोलिसांच्या जाळ्यात