Coronavirus in Maharashtra | मोठा दिलासा! दोन वर्षानंतर राज्यात आज शून्य ‘कोरोना’ मृत्यूची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत आहे. आज (बुधवार) राज्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. 1 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच राज्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तब्बल दोन वर्षानंतर राज्यात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या 24 तासात 544 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Coronavirus in Maharashtra) आढळले आहेत.

 

राज्यात आज 1 हजार 007 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 77 लाख 13 हजार 575 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.05 टक्के झाले आहे. राज्यात आज पर्यंत 1 लाख 43 हजार 706 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 1.82 टक्के झाला आहे.

 

 

आजपर्यंत 7 कोटी 80 लाख 3 हजार 848 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 78 लाख 66 हजार 924 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या राज्यात 6 हजार 643 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात 45 हजार 422 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 660 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

राज्यात आज 62 ओमायक्रॉनबाधित (Omycron) रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात आज 38 ओमायक्रॉनबाधित (Omycron) रुग्णांची नोंद झाली आहे.
यामध्ये पुणे (Pune PMC) 37 तर औरंगाबादमधील (Aurangabad) एका रुग्णाचा समावेश आहे.
सध्या राज्यात 102 ओमायक्रॉनचे रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Two years after the state recorded zero ‘corona’ deaths today, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lilly Summers | ऐकावं ते नवलच ! ‘पुतिन यांचे आदेश न ऐकणाऱ्या सैनिकांना मी…’; अ‍ॅडल्ट मॉडलने रशियाच्या सैनिकांना दिली विचित्र ऑफर

 

Pune Corporation | 100 नगरसेवक निवडूण आल्यानंतरही स्वीकृत नगरसेवकाला सभागृह नेतेपदी संधी ! गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजप संविधानाची पायमल्ली करत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निकालावरून स्पष्ट (Video)

 

PMRDA-Illegal Constructions-Gunthewari | पीएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामे गुंठेवारी अंतर्गत नियमीत होणार ! 31 मे पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याचे पीएमआरडीएचे आवाहन