Coronavirus in Maharashtra | चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patient) संख्या हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या तिप्पट असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
त्यामुळे राज्यातील कोरोनाचा धोका अद्यापही कायम आहे.
राज्यात आज 9 हजार 336 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (New patient) नोंद झाली आहे.
तर 3 हजार 378 कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.
आतापर्यंत 58 लाख 48 हजार 693 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 95.91 टक्के आहे. coronavirus in maharashtra Worrying The number of new patients in the state has more than tripled recover in the last 24 hours know the statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राज्यात आज 123 रुग्णांच्या मृत्यूची (Deaths) नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.01 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 23 हजार 225 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 25 लाख 42 हजार 943 प्रयोगशाळा (Laboratory Test) नमुन्यांपैकी 60 लाख 98 हजार 177 नमुने पॉझिटिव्ह (positive patient) आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 004 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 4 हजार 198 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (institutional quarantine) आहेत.

पुणे शहरातील (Pune City) कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 316 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 297 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 07.
– 297 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 479732.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2783.
– एकूण मृत्यू – 8612.
– आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 468337.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5734.

पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 259 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 205 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू झाला नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 258993.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1348.
– एकूण मृत्यू – 4293.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 253352.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5435.

पुणे जिल्ह्यात 10 हजार ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune District) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 54 हजार 982 रुग्णांपैकी 10 लाख 26 हजार 712 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 10 हजार 402 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.32 टक्के आहे.

Web Titel : coronavirus in maharashtra Worrying The number of new patients in the state has more than tripled recover in the last 24 hours know the statistics

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना एकत्र येणार का?, फडणवीसांचं सूचक विधान अन् चर्चेला उधाण (व्हिडिओ)