राज भवनातील 16 जण निघाले कोरोना पॉझिटिव्ह !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाचा हाहाकार कमी होत नसून पुण्या मुंंबईसह बाधितांची संख्या वाढत चालली आहे. विशेषतः मुंबईतील करोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. शनिवारी राज्यात आतापर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

दिवसेंदिवस राज्यातील करोना बाधितांचा आकडा वाढत असताना राज भवनातील जवळपास 18 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. राजभवनात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांनी कोरोनाची चाचणी केली होती. चाचणी अहवाल मिळाल्यानंतर ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कामावर येताना पृवास, नागरिकांशी संपर्क, स्थानिक परिसर यामुळे संबंधितांना कोरोना झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कोरोनाच्या संघर्षात पोलिस, डॉक्टर, इतर कर्मचारी काम करीत असताना अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले होते.