Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात रूग्ण बर्‍या होण्याच्या संख्येपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Coronavirus in Pune | पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत वेगाने घट होत आहे. रुग्ण कमी होत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) वाढले आहे. मागील काही दिवसांपासून शहरामध्ये दैनंदिन नवीन रुग्णांपेक्षा (New patients daily in the city) बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. परंतु आज (रविवार) बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन रुग्णांची संख्या अधिक आहे. पुणे शहरामध्ये (Pune City) गेल्या 24 तासात 274 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 257 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. coronavirus in pune | 274 new corona patients discharged in Pune in last 24 hours

पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 77 हजार 584 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 66 हजार 594 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 06 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 11 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8571 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 2419 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5271 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 26 लाख 51 हजार 720 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory tests) करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2419 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 296 रुग्ण गंभीर आहेत. तर 431 रुग्ण ऑक्सिजनवर (oxygen) उपचार (Treatment) घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Department of Health) दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुणे जिल्ह्यातील रिकव्हरी रेट 97.42 रुग्ण

पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 46 हजार 677 रुग्णांपैकी 10 लाख 19 हजार 654 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण Active patient 9 हजार 348 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण (Recovery rate) 97.42 टक्के आहे.

Web Titel :- coronavirus in pune | 274 new corona patients discharged in Pune in last 24 hours

हे देखील वाचा

…म्हणून प्रताप सरनाईक एवढे हतबल झाले; खा. संजय राऊत यांनी सांगितले

2 ड्रोनच्या सहाय्याने जम्मू विमानतळावर बॉम्बहल्ला ! व्हाईस एअर चीफ मार्शल एच. एस. अरोरा जम्मूला रवाना

पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर